प्रतिनिधी / कुडाळ
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला असुन मराठ्यांची राजधानी सातारा या नावाने सेल्फी पॉइंट काढून एक आगळीवेगळी शिवजयंती सातारा जिल्ह्यातील वेळे येथील रोहन यादव या शिवभक्तांने साजरी केलीय.
शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपतींच्या 50 फुटी अश्वारूढ पुतळ्यासमोर राजधानी सातारा येथे येणाऱ्या शिवभक्तांसाठी हा उपक्रम सुरू केला असुन, हा छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाच्या मनात आणखी खट्ट व्हावा हा या मागचा उद्देश आहे. मुंबईपासून बेंगलोरपर्यंत जवळपास एक हजार किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर पन्नास फुटी अश्वारुढ पुतळा एकमेव साताऱ्यातील वेळे गावात असुन हा पुतळा पाहण्यासाठी आलेल्या शिवभक्तांसाठी उभारण्यात आलेला आहे.
या सेल्फी पॉइंटचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठ्यांची राजधानी सातारा या दोन्हींची आठवण महामार्गावरुन येणाऱ्या शिवभक्तांना कायम स्मरणात रहावी यासाठी हा सेल्फी पॉइन्ट उभारण्यात आला आहे. यामुळे सेल्फी पॉईन्टला येणारे जाणारे प्रवाशी आवर्जुन सेल्फी घेत आहेत.








