सातारा तालुक्यात सर्वाधिक 77 बाधित, दररोज बळींचा टक्काही घसरु लागला
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा हाहाकार सुरू होता. परंतु ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून दररोज येणारा बाधितांचा आकडा कमी येत असल्यामुळे सातारकरांना दिलासा मिळत आहे. त्याचबरोबर बळींचा आकडाही कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात बेडसाठी नातेवाईकांची होणारी धावपळ पूर्णतः थांबली आहे. आता बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जम्बो कोविड हॉस्पिटल सातारकरांच्या सेवेत दाखल झाले असून ते सोमवारपासून पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होणार आहे.
सातारचा आकडा मंदावला पण धोका कायम
जिल्हय़ात कराड, सातारा, वाई, फलटण हे चार तालुक्यात बाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत असताना बाधितांचा वेग मंदावत गेला. सर्वाधिक बाधित कराडमध्ये येत होते, पण गेल्या आठवडय़ापासून कराडचा आकडा कमी झाला आहे. सातारचा आकडा सर्वाधिक येत असला तरी तो कमी झाल्यामुळे दिलासा मिळत आहे. शुक्रवारी रात्रीच्या अहवालानुसार साताऱयात 77 बाधित आले आहेत. तर कराडमध्ये 45, कोरेगावमध्ये 39, जावलीत 36 जणांचे अहवाल बाधित आले आहेत.
जिल्ह्यातील314 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 14 बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहिर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 314 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 14 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोनाबाधित अहवालामध्ये :
सातारा तालुक्यात 75 बाधित
सातारा 3, सातारा शहरातील सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 1, करंजे पेठ 1, दुर्गा पेठ 1, शाहुपुरी 1, शाहुनगर 6, सदरबझार 2, करंजे 1, समर्थ कॉलनी करंजेतर्फ 1, गोडोली 5, गणेश हौ. सोसायटी गेंडामाळ 1, अंजठा चौक 1, दौलतनगर 1, गंगासागर कॉलनी 1, खेड 1, महानुभव मठ 8, साईदर्शन कॉलनी 1, श्रीधर कॉलनी 1, अहिरे कॉलनी 1, जिजामाता कॉलनी 1, अंजली कॉलनी 1, संभाजीनगर 1, तामजाईनगर 2, झेडपी कॉलनी 1, कृष्णानगर 1, सिव्हील 1, यशोदा जेल 5, पंताचा गोट 1, आरटीओ ऑफीस 1, अतित 2, चंदन कॉलनी कोडोली 3, कोंडवे 2, नागठाणे 1, देवकरवाडी 1, देगाव 1, गावडी 2, पाटखळ 3, वर्णे 1, अपशिंगे 1, पळशी 1,
कराड तालुक्यात 45 बाधित
कराड 3, कराड शहरातील सोमवार पेठ 1, बुधवार पेठ 4, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, वाखाण रोड 1, कोयना वसाहत 1, उपजिल्हा रुग्णालय कराड 1, विद्यानगर 2, कराड पोलीस स्टेशन 1, मलकापूर 2, आगाशिवनगर 2, वनवासमाची 1, जिंती 1, जखीणवाडी 1, केसे पाडळी 1, रेठरे बु. 1, तारुख 1, हेळगाव 2, कळंत्रेवाडी 1, वहागाव 1, उंब्रज 2, मसूर 6, आटके 2, जुळेवाडी 1, काळगाव 1, खेड 1, नांदलापूर 1, विंग 1,
फलटण तालुक्यात 19 बाधित
फलटण शहरातील गिरवी नाका 2, लक्ष्मीनगर 1, पोलीस कॉलनी 1, सोनवडी 1, जाधववाडी 1, हिंगणगाव 2, कोळकी 2, पाडेगाव 1, फडतरवाडी 2, फरांदवाडी 1, साखरवाडी 1, झिरपवाडी 2, तरडगाव 1, तडवळे 1
वाई तालुक्यात 10 बाधित
रविवार पेठ 2, अंबिकानगर 1, भिमकुंड आळी 1, राजेश्वरी अपार्टमेंट 1, भुईंज 1, बोपर्डी 1, धोम कॉलनी 1, गुळुंब 1, शिरगाव 1
पाटण तालुक्यात 12 बाधित
पाटण 2, नांदोळी 1, बेलवडे खुर्द 1, वज्रोशी 1, आंबेवाडी 1, चाफळ 1, सोनवडे 1, ठोमसे 1, तारळे 3
खंडाळा तालुक्यात 11 बाधित
खंडाळा 2, सांगवी 1, लोणंद बाजार तळ 1, लोणंद 1, शिरवळ 3, सुखेड 1, अंबरवाडी 1, भादे 1, वडगाव 2.
महाबळेश्वर तालुक्यात 7 बाधित
गोडवली 3, गणेशवाडी 1, पाचगणी नगरपालिकेजवळ 3
खटाव तालुक्यात 30 बाधित
कातरखटाव 8, तडवळे 2, वडूज 3, गणेशवाडी 3, शिंगडवाडी 1, गादेवाडी 1, पुसेगाव 7, वर्धनगड 3, खातगुण 1, औंध 1
माण तालुक्यात 16 बाधित
कोळेवाडी 1, माळवाडी 1, बिजवडी 1, मानकरवाडी 1, पळशी 2, विरळी 2, म्हसवड 2, वरकुटे मलवडी 1, दहिवडी 2, पिंगळी बु. 2, राणंद 1
कोरेगाव तालुक्यात 39 बाधित
कोरेगाव 3, तळीये 1, विखळे 2, वाठारस्टेशन 1, वाठार 1, रहिमतपूर 1, ल्हासुर्णे 2, अंबवडे 1, चंचळी 11, किन्हई 2, देऊर 2, धावडवाडी 1, धुमाळवाडी 2, एकसळ 1, कुरोली 1, जळगाव 2, सातारारोड 1, तडवळे 3, खेड 1
जावली तालुक्यात 36 बाधित
करंडी त. कुडाळ 3, खामकरवाडी 2, खि-मुरा 1, मेढा 1, मोरावळे 16, मोरवडी 1, ओझरे 1, सायगाव 1, आर्डे 1, आंबेघर 1, भोगावली 1, दुदुस्करवाडी 3, नांदगणे 1, सरताळे 1, केडंबे 1, सोनगाव 1.
इतर ठुमरेवाडी 1, वामुनगर 1, वाठार कॉलनी 2
बाहेरील जिल्ह्यातील पलूस (सांगली)1, वाटेगाव (सांगली)1
14 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या चिमणपुरा (ता. सातारा) येथील 70 वर्षीय महिला, नांदगाव (ता. सातारा) येथील 65 वर्षीय पुरुष, वाघोली (ता. सातारा) येथील 73 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (ता. सातारा) येथील 74 वर्षीय पुरुष, आरळे (ता. सातारा) येथील 80 वर्षीय पुरुष, संभाजीनगर (ता. सातारा) येथील 72 वर्षीय पुरुष, देगाव रोड गोडोली (ता. सातारा) येथील 54 वर्षीय महिला तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये अजिंक्य कॉलनी येथील 70 वर्षीय महिला, मंद्रुळकोळे (ता. कराड) येथील 85 वर्षीय महिला तसेच उशिरा कळविलेले येडेमच्छींद्र (ता. कराड) येथील 83 वर्षीय माहिला, कालवडे येथील 80 वर्षीय पुरुष, शहापूर (ता. कराड) येथील 65 वर्षीय पुरुष, पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, तळबीड (ता. कराड) येथील 84 वर्षीय महिला अशा एकूण 14 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
जिल्हय़ात शनिवारपर्यंत
घेतलेले एकूण नमुने -160455
एकूण बाधित-41295
घरी सोडण्यात आलेले- 32752
मृत्यू–1346
उपचारार्थ रुग्ण- 7197