वाठार किरोली / प्रतिनिधी
कोल्हापूर येथे सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रच्या पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन सरपंच आरक्षण, पॅनल कायदा व अविश्वास प्रस्ताव आणि मुदतवाढ याबाबतसविस्तर चर्चा केली. त्यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की निवडणूक आयोगाने त्वरित निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने कायदा करणे व काही जिल्ह्यातील आरक्षण सोडत करता आल्या नाहीत. परंतु निवडणूक झाले नंतर राहिलेले आरक्षण होईल व कायदा ही लागू करू असे त्यांनी त्यांचे मत स्पष्ट केले .
यावेळी प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले , राज्य सचिव मंदाकिनी सावंत , मार्गदर्शक शंकर खापे बापू ,राज्य सदस्य सुरेखा डूबल ,रेश्मा यादव सरपंच आरेवाडी, शीतल गायकवाड सरपंच शामगाव, विष्णू गायकवाड सरपंच अँभेरी, युवराज भोईटे सरपंच टेंभू ,संजय शिंदे सरपंच कण्हेरखेड, शरद भोसले सरपंच अपशींगे,डॉ . मुल्ला कराड आदी मान्यवर उपस्थित होते.









