नागठाणे / प्रतिनिधी :
आसनगाव (ता.सातारा ) येथे विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी दोघांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती निलेश गंगाराम पवार, सासू पुष्पा गंगाराम पवार (रा.आसनगाव ता.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याची फिर्याद दिपाली निलेश पवार यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.३० मे २०१९ ते ५ मे सन २०२० अखेर आसनगाव येथे राहत्या घरात संशयित निलेश पवार व पुष्पा पवार यांनी तक्रारदार दीपालीस माहेरहून नवीन फ्लॅट घेण्यासाठी तसेच कर्ज फेडण्याकरिता पाच लाख रुपये आणण्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलिस नाईक सुनीता कुदळे करत आहेत.









