सातारा / प्रतिनिधी :
वाई येथील एका 31 वर्षीय महिलेच्या फेसबुक मित्र यादीत फेक नावाने समावेश असलेल्या एका युवकाने महिलेला वारंवार अश्लिल व्हिडीओ पाठवून विनयभंग केला. याप्रकरणी वाई पोलिसांनी खर्शी बारामुरे येथील सुयोग गुलाब ढमाळ याला गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री अटक केली.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई शहरातील एका घरकाम करणाऱ्या 31 वर्षीय महिलेच्या फेसबुक मित्र यादीत सुरज दुधाणे या बनावट नावाने खाते तयार करुन सुयोग ढमाळ या महिलेला वारंवार अश्लिल मेसेजेस पाठवत होता. वारंवार हा प्रकार घडत असल्याने महिलेने वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वाई पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. पोलीस निरीक्षक कोंडूभैरी अधिक तपास करत आहेत.









