प्रतिनिधी/गोडोली
सातारा ते लोणंद रस्त्यावरील वडूथ आणि वाढे येथील मोठे खड्डे पडल्याने पुलाच्या अस्तित्वाला धोका आणि वाहनधारकांची कसरत वाढली आहे. लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने दुर्लक्ष करत असल्याने संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. तर वाढेचे उपसरपंच युवराज नलावडे यांनी या रस्त्यावरील खड्डे मोजा स्पर्धा जाहीर करणार असल्याचे जाहीर केले आहे.
राजमार्ग असलेल्या सातारा ते लोणंद रस्ताची दुरावस्था झाली आहे. वास्तूशास्त्राला ही चकीत करणारे १७५ वर्षाहून अधिक काळ या राजमार्गावरील वडूथ आणि वाढे पुलाच्या अस्तित्वाला पुन्हा धोका निर्माण होऊ लागला आहे. फुटाफुटावर पडलेल्या खड्डे चुकवताना वाहनधारकांची कसरत आणि पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ लागला आहे. या रस्त्यावरुन जाणाऱ्या अनेक दमदार लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने याकडे का दुर्लक्ष केल्याचे कारण जनतेला कळणे अपेक्षित आहे.
अवघ्या सहा महिन्यापुर्वी केलेले डांबरीकरण किती कमकुवत होते, हे पावसाने सिध्द करून दाखवले असून सदरचे खड्डे किमान आता तात्पुरते आणि पावसाळ्यानंतर पुन्हा मजबूत करावेत, अशी मागणी वडूथचे सरपंच किशोर शिंदे यांनी केली आहे.
सदर रस्त्यावरील खड्डे चुकवताना किरकोळ अपघात, वाहनांचा मेंटेनन्स आणि वाहनधारकांना शारीरिक व्याधी वाढू लागल्या आहेत. आता स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांच्यात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या असून तत्काळ खड्डे भरून घ्यावेत. अन्यथा रस्त्यावरील खड्डे मोजायची स्पर्धा जाहीर करणार असल्याचे वाढेचे उपसरपंच युवराज नलावडे यांनी जाहीर केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









