प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना साताऱ्यात शनिवारी रात्री 9 वाजता शनी मारुती मंदिर परिसरात वाढदिवस साजरा करणाऱ्या बड्डे बॉयसह 12 जणांवर शाहुपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढदिवस साजरा करताना गुन्हा दाखल झालेल्यामध्ये विजय पावटे (बड्डे बॉय), लक्ष्मीराज घोडके, व्यंकटेश पावटे, हेम जानी, रजत घोडके, सिधांत जानी, साहिल राजोपाध्ये, स्वयंम गवळी, महेश कारंजकर,कुणाल गवळी, किरण गवळी, आदित्य घोडके यांचा समावेश आहे.शाहुपुरी पोलीस तपास करत आहेत.
Previous Articleकोल्हापूर : नेर्ली येथे तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
Next Article सातारा : चार दुकानदारांवर गुन्हा दाखल








