प्रतिनिधी / सातारा
देशात महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झाली आहे. महिला सुरक्षित नाही. याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने सातारा येथे शाहू चौकात जेल भरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला. सातारा शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्याना एमपी ऍक्ट 68, 69 नुसार कारवाई करण्यात आली.
बहुजन क्रांती मोर्चाचे अमृत सुर्यवंशी, मयूर थोरवडे, विजय काटरे, विनोद लादे, भाऊसाहेब काळोखे, युवराज काटरे, सोमनाथ आवळे, विश्वास कांबळे, गणेश कांबळे, अरुण जावळे, ऍड.विक्रांत संघमित्रा, संपाय रुद्राक्ष यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हाथरस येथे दलित मुलीवर अत्याचार झाला. हत्या केली. बलरामपूर येथे अनुसूचित जातीच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. भदोही, आझमगड, अलिगढ, राज्यस्थानमधील सिकर, बारा, जयपूर, अजमेर, मध्यप्रदेशमधील खरंगाऊन, बांदा, बिहार गया येथे अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. महिला सुरक्षित नाहीत, असे म्हटले आहे. निषेधाचे फलक हाती होती. पोलिसांनी एमपी ऍक्ट 68,69 नुसार कारवाई करण्यात आली.









