वार्ताहर / वाठार किरोली
वाठार किरोली ता. कोरेगाव येथील बाधित पुरुषाच्या सहवासातील हाय रिस्कमधील ४१ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला,३७ वर्षीय महिला,२८ वर्षीय महिला, ४ वर्षीय बालिका आणि १७ व १५ वर्षीय युवकाचा अहवाल बाधित आल्यामुळे आता बाधितांची संख्या ७५ वर पोहचली आहे. ४ ऑगस्टला त्याच कुटुंबातील ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन समिती, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्यावतीने बाधितांच्या निकट सहवासातील सर्वांना होम क्वारंटाईंन केले होते.
त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी रॅपीड तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार येथे घेण्यात आली. यापैकी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कुटुंबातील काही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आणि काहींचा निगेटिव्ह आला आहे . निगेटिव्हवाल्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्वजण हायरिस्क मधीलच पॉझिटिव्ह आल्याने वाठार किरोलीच्या ग्रामस्थांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. वाठारमधील कोरोनाची साखळी वाढत चालली होती यासाठी ग्रामपंचायत, प्रशासन , आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन समिती वारंवार प्रयत्न करीत होती. आता साखळी तुटण्याची शक्यता वाटत आहे. वाठार ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच सविता गुजले, उपसरपंच पोपटराव गायकवाड, मंडलाधिकारी विनोद सावंत, तलाठी राहुल होनराव, ग्रामसेवक जितेंद्र निकम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. असिफ जमादार , डॉ. अनिरुद्ध माने, आरोग्य सेवक माळवदे, परमार हे सर्वजण साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, तहसिलदार रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी किर्ती बोराटे, सहाय्यक निबंधक संजयकुमार सुद्रीक, सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी वाठारमध्ये येऊन प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेतल्यानेच वाठारची साखळी तोडण्यात यश आले आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व गावामध्ये जंतुनाशक फवारणी केली गेली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने देखील लोकांची रोजच्या रोज तपासणी करण्यात येत आहे. आशासेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस घरोघरी जाऊन सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आहेत का याची माहिती घेत आहेत,त्यामुळेच वाठार किरोलीची साखळी तोडण्यात यश येणार आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि कोरोना आजाराला घाबरू नये असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








