दोन पण परदेशी ताब्यात, वाई तालुक्यात खळबळ
प्रतिनिधी / वाई
गेल्या काही दिवसापासून वाई शहरातील एका उच्च ग्रुप कॉलनीत असलेल्या रो हाऊस मध्ये दोन परदेशी नागरिक राहत होते. त्यांच्याकडून चक्क रो हाऊसच्या टेरेसवर गांजाची शेती केल्याची बाब पोलिसांनी आज उघडकीस आणली. याप्रकरणी वाई पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.या प्रकरणाची अद्यापही वाई पोलीस ठाण्यात नोंद झाली नसल्याचे वाई पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार एस.एस. वायदंडे यांनी सांगितले. दरम्यान, वाई पोलिसांनी मारलेल्या छाप्यात गांजाचे साहित्य जप्त केले असून त्या दोन परदेशी नागरिकांना ही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती, अशी की वाई शहरातील एका उच्चभ्रू कॉलनीत असलेल्या रो हाऊस मध्ये दोन परदेशी नागरिक राहत होते. त्या नागरिकांकडून टेरेसवर चक्क गांजाची शेती केली जात असल्याची कानकुन थेट सातारा जिल्हा विशेष शाखेला मिळाली होती. जिल्हा विशेष शाखेतील कर्मचाऱ्यांनी वाई पोलिसांच्या मदतीने आज त्या रो हाऊस वर छापा मारला. रो हाऊस च्या टेरेसवर गांजा शेती केल्याचे बाब उघडकीस आली. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी तेथे गांजाची शेती करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांनाही ताब्यात घेतले.
दरम्यान या छाप्यामुळे वाई शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी या दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र या घटनेबाबत वाई पोलीस ठाण्यास संपर्क साधला असता वाई पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार एस. एस.वायदंडे हे कामात व्यस्त असल्याचे दिसून आले त्यांना विचारले असता त्यांनी अजूनही हा प्रकार दाखल नाही.
एक अकस्मात मयत दाखला आहे असे सांगून एक तक्रार द्यायला नागरिक आले होते त्यांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांना त्यांनी बसवून ठेवले. वास्तविक त्या दोन परदेशी नागरिकांनी वाई शहरात येऊन चक्क टेरेसवर गांजाची शेती फुलवली कशी त्याकरता गांजा चे बी आणले कुठून याची उलट सुलट चर्चा असून रो हाऊस चे मालकाने या परदेशी नागरिकांना कोणत्या कारणामुळे राहण्यास जागा दिली याचाही पोलीस तपास करत आहेत. वाई शहरात बंगल्याच्या टेरेसवर गांजा शेती करताना परदेशी नागरिकांनी काळजी घेतल्याचे दिसून येत असून ही शेती करताना वाईतील काही जणांनी त्यांना सहकार्य केल्याची चर्चा रंगू लागलेले आहे. त्या अनुषंगाने ही वाई पोलिस तपास करत आहेत.
वाई शहरात अनेक जण विना परवाना रहातात.
वाई शहरात अनेक जण हे पोलिसांना विना माहिती देता राहता आहेत. वास्तविक पोलिसांना भाड्याने राहणाऱ्या नागरिकांनी व ज्या घराचे मालक आहे त्यांनी माहिती देणे आवश्यक असते. मात्र वाई शहरात अनेक जणांचे बंगले व फ्लॅट हे विना माहितीच्या आधारे भाड्याने दिले गेल्याची चर्चा असून त्यातूनच कृष्णकुंज या रो हाऊस वर परदेशी नागरिक येऊन राहिले कसे त्यांच्याजवळ वीसा नसताना त्यांना राहायला कसे दिले. गांजाची शेती उत्तम जोमात येईपर्यंत कसे कोणालाच कळले नाही याबाबतही उलट-सुलट चर्चा असून वाई शहरात अनाधिकृत राहणाऱ्यां ची चौकशी होणार कधी असाही सवाल उपस्थित होत आहे.
वाई पोलिस अनभिज्ञ कसे
वाई तालुक्यात लॉकडाउनच्या काळात चक्क एका बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जुगार चालत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनेला मिळते आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा छापा मारते. मात्र त्याची वाई पोलीस आणि भुईज पोलिसांना माहिती नव्हती आत्ताच ही प्रकार तसाच असून वाई शहरात गांजाची शेती बंगल्याच्या टेरेसवर केली जात असल्याची कानकून पोलिसांना का मिळाली नाही पोलिसांचे खबरे तिथपर्यंत पोहोचले नाहीत का असाही सवाल उपस्थित होत आहे.









