प्रतिनिधी / सातारा
रामडोह आळी वाई येथील गणेश वासुदेव मर्ढेकर वय ३५ यांचे शनिवारी अपघाती निधन झाले. त्याचेवर रविवार पेठ स्मशानभूमीत मध्यरात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पश्चात आई, पत्नी, आठ वर्षांची मुलगी व तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
गणेश मर्ढेकर हा वाई एमआयडीसीमधील चोरगे बंधु यांच्या केदारेश्वर इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी चेकर म्हणुन काम करीत होता. दिवाळीच्या सुट्टीवर असल्याने तो व मित्र एम एच ११ सी एम ३८५७ या मोटरसायकल वरुन सासरवाडीत लहान मुलीला भेटायला जात होता. पुणे – कोल्हापुर महामार्गावर कासेगाव हद्दीत येवलेवाडी फाट्यानजीक उभ्या असलेल्या दुधाच्या ट्र्ॅक्टर ला मागुन जोरदार धडकला, असता गणेशला डोक्यास गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला, तो जागीच ठार झाला. त्या सोबत असलेला रमेश सणस किरकोळ जखमी असुन तो उपचार घेत आहे.
रक्षाविसर्जन विधी सोमवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८-३० वा.व दशक्रिया विधी सोमवार दि.३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा.रामडोह आळी येथील राहते घरी होणार आहे.