प्रतिनिधी / वाई
वाई शहरात मागील महिन्याभरात करोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने बंद असलेली बाजारपेठ उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे दुपार पासून व्यवहार सुरु झाले.
जून अखेर व जुलै महिन्यात शहरातील बाजारपेठ, मध्यभागात, बँक अधिकारी व कर्मचारी,पोलीस व पालिका कर्मचारी बाधीत आढळून आल्याने हळळू करत संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. यामुळे शहराची बाजारपेठ बंद होती. व्यापाऱ्यांचा बाजारपेठ सुरु करण्यासाठी प्रशासनावरचा दबाव वाढत होता. व्यापाऱ्यांनी आमदार मकरंद पाटील यांची भेट घेऊन बाजारपेठ सुरु करण्यासाठी प्रशासनाबरोबर चर्चा करण्याची विनंती केली होती. शनिवारी सायंकाळी बैठक झाली. आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आदी मान्यवर व शहरातील महत्वाच्या व्यापाऱ्यांची बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे झाली. यावेळी व्यापारी प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील महिन्याभरात शहरात १९० आढळून आलेले आहेत. अनेक करोनामुक्त झाले तर सहा रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. शहराच्या आजूबाजूच्या उपनगरात ग्रामपंचायत परिसरातही मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. आदी बाबी प्रशासनाने समोर मांडल्या. मागील महिन्यापासून व त्याआधी मार्च एप्रिल, मे महिन्यातही व्यापार, अनेक क्षेत्र बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन हलाकीचे झाले आहे.व्यापाऱ्यांनी टाळेबंदीत प्रशासनाला सहकार्य पूर्ण केले आहे.मात्र आता बाजारपेठ, बांधकामे व इतर उद्योगधंदे सुरु करणे गरजेचे असल्याचे व्यापारी प्रतिनिधींनी सांगितल्यावर आमदार पाटील यांनी प्रतिबंधित क्षेत्र कमी करून बाजारपेठ खुली करण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे आज बाजारपेठ दुपार पासून सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत नियम पाळून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. त्याप्रमाणे दुपारपासून दुकाने उघडली.
आज बाजारपेठ उघडण्यासाठी दारू विक्री दुकानदार अग्रेसर होते. मागील दोन दिवसांपासून त्यांनी व्यापाऱ्याच्या वेळोवेळी बैठका घेऊन शासनाचा आदेश आला नाही तरी दुकाने सर्वांनी उघडायची मग पोलीस कारवाई झाली तरी चालेल असे काही पदाधिकारी व्यापाऱ्यांना या बैठकीत सांगत होते. दुपारी दुकाने उघडण्यापूर्वीच शहरातील दारू विक्री दुकाने खुली झाली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








