वाई पालिकेच्या विशेष सभेत दोन विषयांना मंजुरी, घरोघरी बाधित रुग्णांना पॅरा मेडिकल एजन्सी नेमणार
रुग्णांना नेआण करण्यासाठी वाहन भाडे तत्वावर घेण्याचा ठराव मंजूर
प्रतिनिधी / वाई
वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वाई पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन व्हीसीवर पार पडली.
या सभेत दोन विषयांना मंजुरी देण्यात आली. मुख्याधिकारी विद्या पोळ, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, चरण गायकवाड, भारत खामकर, महेंद्र धनवे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. कोरोनाचे जे रुग्ण वाढत आहेत. त्या रुग्णांना घरात होम आयोसोलेशनमध्ये उपचार करण्यासाठी डॉक्टर, नर्स यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी एजन्सी नेमण्याचा ठराव झाला आहे. तसेच रुग्णांना ने आन करण्यासाठी एका खाजगी वाहन ही भाडे तत्वावर घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.









