प्रतिनिधी / वाई
कोरोनाच्या अनुषंगाने जे नियम तयार केले आहेत. ते नियम पाळले जातात की नाही याची तपासणी करण्याकरता पथक नेमले आहे. हे पथक ग्रामीण भागात फिरकत नाही. दक्षता कमिटी नेमकी कोणावर कारवाई करणार म्हणून वाई तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे. तोंडावरचा मास्क तर गायब झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, वाई पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव झाला असून बांधकाम विभागाच्या लिपिकास बाधा झाली आहे. त्यामुळे पंचायत समितीत खळबळ उडाली आहे.
वाई तालुका हा तसा पश्चिम भागात डोंगर दऱ्यांनी व्यापलेला तर उत्तर, दक्षिण व पूर्व भागात थोडीशी पुढारले गावे आहेत. कोरोना पासून कोणतेही गाव वाचले गेले नाही. पश्चिम भागात जोर घेतला होता. अजून ही जोर कायम आहे. तेथे नियम पाळले की नाही हे बघायला कोण येत नाही. म्हणून स्थानिक ग्रामस्थ नियम पाळत नाहीत. तोंडावरचा मास्क तर गायब असतो. मॉर्निंग आणि एव्हीनींग वॉकचे फॅड आता गावोगावी रुजले आहे. मेणवली गावापर्यंत काही मंडळी मास्क न घालता दररोज चालत असतात. तोच प्रकार बावधनकडे जाताना येताना दिसतो. वाई तालुक्यातील ग्रामीण भागात समाज मंदिरात पत्ते कुठण्याचा कार्यक्रम सुरू असतो हाच कोरोना पसरण्याला कारण बनू पहात आहे. ग्रामदक्षता कमिटीचे सदस्य ही काही गावात पत्ते कुठताना दिसतात.
वाई पंचायत समितीत कोरोनाची एण्ट्री
वाई पंचायत समितीत नव्याने बदलून आलेले बांधकाम विभागतले लिपिक हे कधीही टेबलवर काम केले नाही. सतत नेत्यांच्या उठबशीतले असल्याने वाई पंचायत समितीत ते एका जागी गप्प बसले नसणार त्यांना कुठे बाधा झाली ते समजू शकले नाही मात्र, ते शनिवारी बाधित झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी ही माहिती वाई पंचायत समितीत मिळताच निर्जंतुक फवारणी करण्यात आल्याचे समजते.
धोम धरण परिसरात सुरक्षा वाऱ्यावर
धोम धरण परिसरात अनेक नागरिक फिरणाऱ्यासाठी येत आहेत.त्यांना अटकाव करण्यासाठी पोलीस चौकी धरण परिसरात आहे.तिची वाताहत झाली आहे.झाडे झुडपे वाढली आहेत.अगदीच तर अचानक गस्त घालून कारवाई केली जात नाही, त्यामुळे कोरोना वाढीला प्रशासन आणि स्थानिक ही जबाबदार आहेत, अशी चर्चा आहे.
वाई तालुक्यातील चिंधवली येथील 50 वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी येथील 58 वर्षीय महिला, चाहूर येथील 55, 78वर्षीय पुरुष, रविवार पेठ 33 वर्षीय पुरुष, खानापूर 52 वर्षीय पुरुष, परखंदी येथील 57, 25 वर्षीय महिला, भोगाव येथील 51 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले.
Previous Articleमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना कोरोनाची लागण
Next Article गगनबावडा कोरोना सेंटरमधील रुग्णांना साहित्य वाटप








