वाई / प्रतिनिधी
वाई शहरातील व्यापारी व भाजी विक्री करणाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वाब तपासणी करण्यात यावी अशी नोटीस वाई पालिकेच्यावतीने देण्यात आली होती.त्याच अनुषंगाने मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्यासोबत बैठक पार पडली होती.त्यानुसार वाई मंडईतील पहिल्या दिवशी106 भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी अँटीजेन टेस्ट केली.सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली. तर दुसऱ्या दिवशी 102 जणांची टेस्ट केली.त्यांचे ही रिपोर्ट निगेटिव्ह आले.या टेस्ट शिवसेना भवनात करण्यात आल्या.वाई भाजी विक्री संघटनेचे मार्गदर्शक साचिन फरांदे, हेमंत येवले, अजित वनारसे, उमेश शहा, अशोक लोखंडे, संतोंष जमदाडे, युसूफ बागवान, ऋषिकेश नेवशे, रफिक शेख या सर्वानी पारिश्रम घेतले. वाई शिवसेना शहरप्रमुख किरण खामकर यांनी सहकार्य केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









