कारखाना कार्यस्थळावर उत्पादन विक्रीचा शुभारंभ!
औंध/प्रतिनिधी:
सध्या लोकांचा कल रासायनिक कडून सेंद्रिय उत्पादनाकडे आहे,वर्धन अँग्रोच्या टीमने बाजारपेठेचा अभ्यास करून लोकांच्या आरोग्याचा विचार करून विविध उत्पादने बाजारपेठेत आणली असून ही उत्पादने लोकांच्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे प्रतिपादन औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांनी केले.
वर्धन अँग्रो कारखाना कार्यस्थळावर फॅक्टरी आऊटलेटच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चेअरमन धैर्यशील कदम,कार्यकारी संचालक विक्रमशील कदम,मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित डूबल,चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ,संचालक सतीश पिसाळ,रणजित चव्हाण,वैभव नलवडे,सुनील कोकितकर,चंद्रकांत खराडे,संतोष ननावरे,इस्माईल संदे,आश्विन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना भापकर म्हणाले की,सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अशी एक किलो गूळ पावडरची उत्पादने लोकांना सहज उपलब्ध करून देण्याचे काम वर्धन अँग्रोने केले आहे.
चेअरमन धैर्यशील कदम म्हणाले की, केवळ कारखाना कार्यस्थळावर नव्हे तर प्रत्येक गावच्या बाजारपेठेत तसेच डी. मार्ट,पतंजली यांच्यामार्फतही ग्राहकांच्या पर्यंत उत्पादने पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत,सल्फर मुक्त,केमिकल मुक्त गूळ पावडर,खांडसरी साखर याबरोबरच अन्य उत्पादनाची उत्तम,निर्भेळ,श्रेणीची उत्पादने बाजारपेठेत लवकरच आणणार आहोत.कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी कारखाना गाळप पूर्ण क्षमतेने सुरू असून शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचा जास्तीतजास्त ऊस गाळपास पाठवावा असे आवाहन केले आहे.
यंदाही दिवाळी गोड होणार
-यंदा सभासदांची दिवाळी गोड करणार-कारखाना व्यवस्थापन व संचालक मंडळाने यंदाही सभासदांची दिवाळी गोड करण्याचे ठरविले असून वीस किलो मोफत साखरेचे वाटप लवकरच करण्यात येणार असल्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी यावेळी सांगितले.









