सातारा / प्रतिनिधी :
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद सातारा जिल्हा यांच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देऊन वकीलांसाठी फॅमिली इन्शुरन्स स्किम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देताना अधिवक्ता परिषदेच्या प्रांत सदस्या व जिल्हा निमंत्रक ॲड.मंजुषा तळवलकर, जिल्हा अध्यक्ष ॲड. नितीन शिंगटे, जिल्हा सचिव अनिरुद्ध जोशी, सहसचिव अश्विनी झाड आदी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना न्याय प्रवाह अंक देऊन अधिवक्ता परिषद साताऱ्याच्या वतीने करत असलेल्या कार्याची माहिती दिली. अधिवक्ता परिषद सातारा करत असलेल्या कामांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.









