प्रतिनिधी / सातारा
सातारा लोणंद हा रस्ता सध्या बांधकाम विभागाकडून हायवेकडे सोपवण्यात आला आहे. हीच संधी पाहून एका लाकूड तोड्याने तब्बल चाळीस बाभळीची झाडे आणि इतर झाडांची तोड केली आहे. प्रामुख्याने ही तोड करताना कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे तरुण भारतकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले असून त्याविरुद्ध आंदोलन ही रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी आंदोलन केले होते.
अशी रस्त्याच्या कडेची झाडे कोणीही तोडून नेत असेल तर जंगल नष्ट व्हायला वेळ लागणार नाही, अशी शोकांतिका युवराज कांबळे यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, कांबळे यांनी संबधित झाडे तोडणाऱ्यास अटकाव ही केला होता.बांधकाम विभागात जाऊन विचारणा ही करण्यात आली होती.तरीही वृक्ष तोड थांबली नाही.त्यामुळे पर्यावरण प्रेमीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.









