प्रतिनिधी / लोणंद
ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटनादिवशीच सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या आरोपींना लोणंद पोलिसांनी केले जेरबंद लोणंद ता खंडाळा गावच्या हद्दीत दि ९ सप्टेंबर रोजी लक्ष्मी प्लाझा येथील लक्ष्मी गोल्ड नावचे ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाच्या दिवशीच एक पुरुष व एक महिलेने हातचलाखीने दुकानातील सुमारे १ लाख ८६ हजार रुपयाचे दागीने चोरी करून परागंदा झाले होते. सदर या घटनेबाबत लोणंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता.
सदर घडलेल्या गुन्ह्याचा उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे सपोनि विशाल वायकर यांनी गुन्ह्याची उकल करण्याकरिता लोणंद शहरातील तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशयित आरोपीचा माग काढण्याच्या सुचना दिल्या त्याप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक गणेश माने व पोलिस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत पुणे येथील सराईत चोरटे असल्याचे निष्पन्न करून आरोपीचा माग घेऊन गुन्ह्यातील संशयित आरोपी ज्योत्सना सुरज कछवाय वय २९ वर्ष रा आंबेगाव खु पुणे व निलेश मोहन घुते वय 3४ २ा गुजरवाडी फाटा कात्रज पुणे यांना अटक केली असून त्यांचेकडून चोरी केलेले १ लाख८६ हजार रुपयाचे दागिने तसेच गुन्हा करण्याकरिता वापरलेली वॅगनर कार जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार, स्वाती पवार, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, फैय्याज शेख, अविनाश शिंदे, अमोल पवार , केतन लाळगे गोविंद आंधळे, वैशाली नेवसे, प्रिया नरुटे यांनी सहभाग घेतला होता.









