प्रतिनिधी / सातारा
साताऱ्यातील एकाने 1 लाख 40 हजार रुपयांच्या लोखंडी प्लेटा भाड्य़ाने नेवून त्या परत न दिल्याने त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय श्रवण सुर्यवंशी (रा. चिमणपुरा पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविराज पोपट चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीवरुन त्याचा श्री सपलायर्स, डेव्हलपर्सचा व्यावसाय आहे. त्यांनी संजय सुर्यवंशी यास सेंट्रींगच्या 67 लोखंडी प्लेटा दि. 14 एप्रिल 2021 रोजी दिल्या होत्या. त्या त्याने परत केल्या नाहीत. विश्वासघात करुन फसवणूक केल्याप्रकरणी संजय सुर्यवंशी याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार जाधव हे तपास करत आहेत.









