सातारा / प्रतिनिधी :
वखारीवर कारवाई करु नये, यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चोरेच्या वनरक्षकाला रंगेहाथ अटक केली.
राहुल बजरंग रणदिवे (वय 34, रा. कोयना सोसायटी, गोडोली सातारा) असे अटक केलेल्या वनरक्षकाचे नाव आहे.
याबाबत लाचलुचपत विभागागकडून मिळालेली माहिती अशी, की सातारा येथील 50 वर्षीय तक्रारदारास लाकडाच्या वखारीवर कारवाईची भिती चोरे परिसराचे वनरक्षक राहुल रणदिवे यांनी दाखवून 25 हजार रुपयांची लाच मागितली. कारवाई करायची नसेल तर पैसे द्या असा तगादा लावला. त्यावरुन तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करताच दि.8 रोजी सापळा लावला अन् त्या सापळ्यात रणदिवे हे अलगद सापडले.









