सातारा / प्रतिनिधी
टोळी गाव जिल्हा जळगाव येथील चर्मकार समाजातील तरूणीवर सामूहिक बलात्कार करून विष पाजून हत्या करणाऱ्या नराधमाना त्वरीत फाशी देण्यात यावी, या मागणीयाठी रिपाईच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यलयाच्यासमोर निषेध करण्यात आला.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.या आंदोलनात मदन खंकाळ, किरण ओव्हाळ,बाबा ओव्हाळ, सिद्धार्थ समीनदर, अमित मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, टोळी या गावी मामाकडे आलेली चर्मकार समाजातील मुलगी मेडिकल स्टोअर मध्ये गेली असताना गावातील काही गावगुडांनी तिला बळजबरीने गाडीमध्ये बसवून कासोदा येथे नेहून गुंगेचे औषध पाजून रात्रभर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यामध्ये शिवानं पवार, अशोक पाटील, पप्पू पाटील व इतरा वर जलदगती न्यायलयात खटला चालवावा व आरोपीना फासावर लटकवा या मागणी साठी व चर्मकार तरुणीवर झालेल्या अन्यायचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.नराधमानी या प्रकरणाची वाच्यता होउ नये म्हणुन त्या नराधमांनी 20 वर्षीय दलित तरूणीस विष पाजून आज्ञात स्थळी फेकून दिले तरी त्या पीडित मुलीचा धुळे येथेल सरकारी दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तरी आरोपी मध्ये शिवानंद पवार ,अशोक पाटील पप्पू पाटील व इतर लोकांवर अँट्रासिटी, खुन बलात्कार अशा गुन्हे दाखल करू न नराधमाना त्वरीत अटक करून त्वरीत फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









