गेली ४८ वर्षेांपासुन गरजू विद्यार्थ्यांना केली जाते शैक्षणिक मदत
प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील ज्यॆष्ठ समाजसेवक कै. रा.ना. गोडबोले यांनी स्थापन केलेल्या आणि गोडबोले कुटुंबियांनी वाढविलेल्या रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टतर्फे गेली ४८ वर्षे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाते. या वर्षीच्या सहाय्यासाठी करावयाच्या अर्जाचे फॉर्म्स आय.डी.बी.आय. ट्रस्टीशीप सर्व्हिसेस लि. विश्वस्त भवन, २१८, प्रतापगंज पेठ, MSEB ऑफिस शेजारी, सातारा येथे रु.१/- या नाममात्र शुल्कात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी ते पूर्ण भरून दि. १० सप्टेंबर २०२० पूर्वी तेथेच द्यावेत असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त अशोक गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले, अुदयन गोडबोले, प्रद्युम्न गोडबोले व डॉ. चैतन्य गोडबोले यांनी केले आहे.
अर्जामध्ये मोबाईल नंबर नमुद करावा. अर्ज घेताना व परत देताना मास्क व सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे. शाळा बंद असल्याने सद्गृहस्थांची शिफारस चालेल.ही योजना सातारा शहर व परिसर येथील विद्यार्थ्यांच्या साठीच मर्यादित आहे, असे जेष्ठ करसल्लागार अरुण गोडबोले यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








