सातारा \ प्रतिनिधी
सातारा येथील राष्ट्रवादी कार्यालयावर आज सकाळी दहाच्या सुमारास अज्ञात चार ते पाच जणांनी दगड फेक केली. कार्यालयाच्या खिडकीच्या काचा अज्ञातांकडून फोडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या घडलेल्या प्रकारनंतर राष्ट्रवादी नेते आमदार शशिकांत शिंदे हे तातडीने घटना स्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले.
Previous Articleसांगलीत लॉकडाऊनचा कडक अंमल
Next Article कोरोनाचा कहर : आता केरळमध्येही लॉकडाऊन!









