सातारा / प्रतिनिधी
निळ्याशार पाण्याचा धरणाचा जलाशय, पिवळी काढायला आलेली भात खाचर, फेसळणारे धबधबे,शेवाळलेले निसरडे रस्ते, कधी धुके तर कधी उन्ह तर पाऊस अस वातावरण परदेशातील नाही तर सातारा तालुक्यातील आहे.अशा निर्सग रम्य परिसरात सातारा रायडर्स ग्रुपने बुलेटवरून सवारी केली.अनेक गडकोट मोहिमा करणारा साताऱ्यातील ग्रुप म्हणजेच मावळे ग्रुप.या ग्रुपमधूनच सातारा रायडर्स ची स्थापना झाली. गेल्यावर्षी घटस्थापनेच्या दिवशी झाली.नुकतीच त्यांनी सातारा, परळी, नित्रळ, केळवली,जळकेवाडी, झुंगटी, कास पठार-सातारा अशी राईड केली.या राईडमध्ये सहभागी झालेले गोरख जाधव, संभाजी पवार, प्रशांत जाधव, प्रताप देशमुख, गणेश काटे, राज धनावडे, निलेश निकम, सचिन भोसले, दीपक बादापुरे, संदीप कोंडे, संतोष कुलकर्णी यांनी अनोखा प्रवास केला.सह्याद्रीच्या आडवाटेवर भटकंती करायची म्हणजे साहसच… आणि या साहसी मोहिम सातारा रायडर्सचे अकरा मावळ्यानी फत्ते केली.उरमोडीच्या काठाकाठाने कधी उंचावर पोहोचले काही समजलच नाही.चिखलाने माखलेला शेवाळलेला रस्ता.कधी दुचाकीच अर्ध चाक रुतून बसत होत तर कधी फक्त मागचं चाक जागेवरच वेगानं फिरत होत..काही ठिकाणी तर रस्ताच वाहून गेला होता.. जोडीला हिरवागार निसर्ग आणि प्रवास करणारे सातारा रायडर्सचे शिलेदार.. ठरलं होतं काही झालं तरी परत फिरायचं नाही ..विश्वास होता मनगटावर आणि अभेद्य सह्याद्रीवर अन शेवटी मोहीम फत्ते झालीच.. पहाटे सहाला सुरू झालेला प्रवास 12 वाजता संपला…
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








