प्रतिनिधी / सातारा
जिह्यातील ग्रामीण भागातील यात्रा जत्रा सुरु होत आहेत. कोरोनामुळे सर्व यात्रा बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे व्यावसायांवर परिणाम झाला असून कुटुंबिय आर्थिक संकटात सापडले आहेत. याकरता यात्राजत्रा सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी यात्रा जत्रा व्यापारी संघटनेच्यावतीने खासदार उदयनराजे, आमदार मकरंद पाटील, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन दिले.
निवेदन देताना यात्रा मिठाई विक्रेते संघटनच्या राजेंद्र खामकर, शिवसेनचे वाई शहरप्रमुख किरण खामकर, फिरते आईसक्रीम विक्रेते संघटनेचे सचिन कदम, कटलरी विक्रेते संघटनेचे इरफान पटवेकर, सतीश कायगुडे, विक्रम अवधूत, किशोर खामकर, सतीश मोहिते आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वाई तालुक्यातील सर्व गावाच्या ग्रामदैवतांच्या यात्रा सुरु होत आहेत. गतवर्षी कोरोनामुळे यात्रा सर्व रद्द करण्यात आल्या. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. यात्राजत्रावर अनेकांचे कुटुंबिय अंवलंबून आहेत. त्यासह विविध अडचणींचा सामना व्यावसायिक करत आहेत. ज्या आधारावर शासनाने आठवडी बाजार, मॉल्स, पर्यटन स्थळ, सुरु करण्याची परवानगी दिली. त्याच आधारावर वाई तालुक्यातील यात्रा सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.