प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील मुख्य बसस्थानकातील पार्सल विभाच्या ईमारतीचा काही भाग सोमवारी कोसळला. सुदैवाने कोणतीही जिवीत्त हानी झाली नाही, पण येथे उभ्या करण्यात आलेल्या काही दुचाकी वाहणांवर हा भाग पडला होता. पर्सल विभागाची ही इमारत अत्त्यंत जुनी असुन या इमारतीच्या अनेक ठिकाणचा स्लॅबचा भाग वेळोवेळी कोसळत असतो.
मध्यंतरी जवळपास पाच ते सहा महिन्यापुर्वी एक पुणे-मुंबई हुण येणारी एक खासगी ट्रव्हल्स रिवर्स घेताना या इमारतीस धडकली होती. त्यादरम्यान ही या इमारतीचा काही भाग कोसळला होता. पण आत्ता सोमवारी अचानक पणे ही येथील दुसऱया मजल्या वरील स्लॅबचा काही भाग कोसळला आहे.
त्यामुळे या इमारतीत कामकाज करणाऱया कर्मचाऱयांच्या जिवाला सध्या धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाचे या इमारती कडे पुर्णतः दुर्लक्ष झाले असल्याचे दिसत आहे. शहरात धोकादायक असणाऱया इतर इमारती, किंवा निवासस्थळे पाडण्याचे आदेश बांधकाम विभाकडून देण्यात येतात. आणि त्यासंबंधी कारवाई करण्यात येते. पण या इमारतीकडे मात्र बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोणतीही जिवित्त वित्त हाणी होण्यापुर्वी बांधकाम विभागाने योग्य ती कारवाई करावी.








