सातारा / प्रतिनिधी
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कामकाज पाहिलेले व चार वर्षे सातारा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून राहिलेले अभिजित बापट यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदी अचानक नियुक्ती झाली आहे.सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांची तब्बल तीन वेळा या लॉक डाऊन मध्ये बदली झाली आहे.अजून त्यांचे ठिकाण निश्चित झाले नाही परंतु त्याना नागपूर महानगरपालिकेत बदली होण्याची शक्यता आहे.
सातारा पालिकेत गेल्या महिन्यात मुख्याधिकारी शंकर गोरे यांची बदली झाली.त्यांची बदली झाल्यानंतर अकोला येथून रंजना गगे यांना सातारा पालिका मिळाली होती.त्यांची यापूर्वी ठाणे येथून अकोला येथे बदली झाली होती. नियमाने काम करण्यात त्यांचा हातखंडा होता.त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्या नकोत म्हणून त्यांच्या बदलीसाठी थेट नगरविकास विभागातून बदलीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.त्यावेळी तरुण भारतने बदलीच्या अफवा असे वृत्त प्रसिद्ध केले होते.सोलापूर महानगरपालिका येथील अभिजित बापट यांना सातारा येथे आणायचे प्रयत्न सुरू होते, अशी चर्चा पालिकेत सुरू होती.
आज अभिजित बापट यांच्या नियुक्तीचे रीतसर आदेश निघाल्याने सातारकर नागरिकांना धक्का बसला आहे.अभिजित बापट हे प्रशासन राबवण्यात अव्वल आहेत.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कास धरण उंची साठी पाठपुरावा नगरविकास विभागाकडे केला होता.तसे स्वच्छतेत सातारा शहराचे नाव झळकवले होते.पुन्हा अभिजित बापट आल्याने सातरकरांना सुखद धक्का बसला आहे.शंकर गोरे यांची चाळीसगाव येथे बदली झाली आहे.आता पुन्हा मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पेंटिंग दिसणार आहे.
Previous Articleकोल्हापूर : गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 353 वर
Next Article गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट








