प्रतिनिधी / सातारा
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर व 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिला टप्पा सुरु झाला आहे. प्रत्येक गावोगावी जाऊन तपासणी केली जात आहे. लोकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील काळज, खंडाळा तालुक्यातील कोपर्डे व पाडळी, पाटण तालुक्यातील कुठरे येथे आरोग्य सेविका, स्वयंसेवक व आशा कर्मचारी यांनी गृहभेटी देवून माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहीमेची सुरुवात केली.
मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 6 लाख 80 हजार कुटुंबांना पथक भेट देणार आहेत. या टीममध्ये तीन जणांचा समावेश असून यांना कोरोनादूत म्हणून संबोधण्यात येणार आहे. या पथकाकडून विचारण्यात येणारे प्रश्न हे सोपे असणार असून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे द्यावी. कोरोना संसर्गाबाबत जनाजागृती व्हावी हा या मोहिमेचा उद्देश आहे. यामध्ये मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे यांची जनजागृती करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी मास्कचा वापर करणे, हात वेळोवेळी धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे याची सवय लावावी.
या मोहिमेंतर्गत कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून काय काळजी घ्यावी, होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी काय काळजी घ्यावी तसेच कोरोनातूनबरे झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याची सर्व माहिती मोहिमेंतर्गत सांगण्यात येणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









