प्रतिनिधी / सातारा
माझे कुटुंब माझी जबाबदारी आरोग्य पथक आपल्यादारी या सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नवीन उपक्रमाचे आरोग्य केंद्र मसूर येथे सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे व जि.प. सदस्य निवास थोरात प.स. सदस्य शालन माळी कराड तालुक्याचे आरोग्य अधिकारी श्रीमती देशमुख यांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोखंडे. मसूरचे सरपंच पंकज दीक्षित मसूरचे उपसरपंच विजयसिंह जगदाळे, जगन्नाथ कुंभार, राष्ट्रवादी अल्पसंख्याक मसूर शहराध्यक्ष सिकंदर शेख. कासम पटेल आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग अंगणवाडी सेविका व आशा सेविका व मदतनीस सर्व उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
Previous Articleसातारा जिल्ह्यात 583 नागरिकांना दिला डिस्चार्ज
Next Article टोयोटा किर्लोस्कर 2 हजार कोटी गुंतवणार









