प्रतिनिधी / सातारा
मुंबई येथे माजी सैनिक मदन शर्मा यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध सातारा शहर भाजपच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदन देऊन करण्यात आला. निवेदन देताना भाजपचे माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप पवार (आर्मी), विनीत पाटील (एअर फोर्स), शंकर माळवदे (नेव्ही), सूर्यकांत पनस्कर (नेव्ही) यांनी निवेदनाची माहिती दिली.
यावेळी भाजपा सातारा शहराध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. उत्कर्ष रेपाळ, व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.सचिन साळुंखे, औद्योगिक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, आरोग्य सेवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक कदम, राजेंद्र पवार उपस्थित होते.









