प्रतिनिधी-नागठाणे
शनिवारी सायंकाळी नागठाणे परिसराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मांडवे (ता.सातारा) येथे पुन्हा एकदा ढगफुटी होऊन ओढ्या-नाल्याना पूर आला. या पुरात गावातील वृद्ध महिला वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. मधुमती सुधाकर माने (वय.६५,रा.मांडवे,ता.सातारा) असे पुरात वाहून गेलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नागठाणे परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.यावेळी नागठाणे गावच्या पश्चिमेस डोंगर पायथ्याला असलेल्या मांडवे गावात पुन्हा एकदा ढगफुटी झाली.येथे सुमारे दोन तास पडलेल्या मुसळधार पावसाने शिवारातील ओढ्याना पूर आला.
या मुसळधार पावसात माकडजाई पायथा येथे असलेल्या शिवारातुन पुतळाबाई माने या वृद्धा घराकडे निघाल्या होत्या.वाटेत असलेला ओढा ओलांडत असताना अचानक पुराचे पाणी आल्याने त्या पाण्यात वाहून गेल्या.त्यांचा मृतदेह गावानजीक ओढ्याच्या पात्रातील झुडुपात अडकलेल्या स्थितीत तासाभराने सापडला.मधुमती माने या माजी सरपंच राजेंद्र माने यांच्या मातोश्री होत्या.
ओढ्याच्या पुराचे पाणी ओढ्यालगतच्या असलेल्या विहिरीतही आल्याने विहिरी भरल्या गेल्या.तर काही घरांमध्येही पाणी शिरल्याने नुकसान झाले.मृत्य मधुमती माने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला.बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ.सागर वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह तात्काळ मांडवे गावाकडे धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली.रात्री उशिरापर्यंत नागठाणे परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









