प्रतिनिधी / सातारा
राज्य शासनाचे महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचावी यासाठी महिला लोकप्रतिनिधी, बचत गट व सामाजिक संस्थांची मदत घेऊन सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षिततेबाबत नवीन कार्यपद्धती अंमलात आणावी अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजनेबाबत सातारा पोलीस दलाने एक कार्यप्रणाली तयार केली आहे. याचा आढावा गृह राज्यमंत्री देसाई यांनी शासकीय विश्रामगृहात घेतला. या आढावा बैठकीस पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे आदी उपस्थित होते.
पोलीस विभागातील ज्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना ज्युडो कराटे येते, अशा कर्मचाऱ्यांकडून शाळा, महाविद्यालयातील मुलींना स्वत:ची सुरक्षा कशी करता येईल यासाठी प्रशिक्षण द्यावे. शाळा व महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सुरु आहेत. प्रत्येक शाळेला व महाविद्यालयांना भेटी देवून पोक्सो कायद्यांची माहिती द्यावी. तयार करण्यात आलेल्या कार्यप्रणालीनुसार महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे तात्काळ दाखल करुन विविध योजनांतर्गत त्यांना आर्थिक मोबदला द्या, अशा सूचनाही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी केल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









