प्रतिनिधी / सातारा
बाप्पांचे आगमन झाल्यानंतर काल गौराईही सोनपावलाने घरी आल्या. गौराई बसवताना महिला वर्ग आकर्षक अशी आरास, सजावट करतात. दरवर्षी वेगवेगळ्या पध्दतीची सजावट महिला वर्ग करत असतो.
अशीच मनमोहक गौराईची सजावट शाहुपुरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कोमल पवार यांनी त्यांच्या घरातील गौराई समोर केली. कोरोना योद्धा डॉक्टर, पोलीस यांचा देखावा त्यांनी गौराईसमोर केला आहे. त्यांनी केलेल्या या देखाव्यांचे कौतुक पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ट्विटरवरून तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवरुन केले आहे.










