सातारा / प्रतिनिधी :
सातारा येथे आयोजित महिला उद्योजकता विकास शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. नेहा ओंकार खैर – लाटकर व माणदेशी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
माणदेशी फाउंडेशनच्या ज्योती जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिराचा मुख्य उद्देश महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वयंपूर्ण व्हावे हा आहे. त्यामुळे आपला व आपल्या परिवाराचा विकास साधता येतो. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महिलांनी सोशल डिस्टंसिग पाळले. यावेळी सोमवार पेठेतील मान्यवर महिलांची उपस्थिती होती.









