सातारा/प्रतिनिधी
महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद सर्वांसाठी अतिशय अन्यायकारक व नुकसानदायी आहे. बंद पुकारण्याच्या आधी संबंधितांनी या सर्व वस्तुस्थितीचा विचार केलेला नाही. त्यांना सर्वसामान्य जनतेच्या होणाऱ्या नुकसानीशी आणि दुःखाशी काहीही घेणे देणे दिसत नाही. मी भाजपातर्फे आपल्या सर्वांना आवाहन करतो की, कोणीही या बंदमध्ये सहभागी होऊ नये, आपले व्यवहार हे सुरळीत चालू ठेवावेत, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेले एक-दीड वर्षापासून कोरोना महामारी मुळे सर्वसामान्य जनता, व्यापारी, उद्योग वर्ग मेटाकुटीला आला आहे. सर्वांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. ती पूर्ववत होण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये सुंदोपसुंदीच्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक वेठीस धरून पुकारलेला बंद हा चिंताजनक आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बंद ठेवायला लावणे, जबरदस्ती करणे हे चुकीचे आहे. कायद्याला धरून नाही. कोरेनाची लाट आता कुठे कमी होताना दिसत आहे. जनजीवन व आर्थिक व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक दिवस हा कमाईच्या दृष्टीने सर्वसामान्य जनता, व्यापारी, छोटे-मोठे व्यवसायिक यांना महत्त्वाचा आहे. अशामध्ये दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजी महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद सर्वांसाठी अतिशय अन्यायकारक व नुकसानदायी आहे. त्यामुळे कोणीही या बंदमध्ये सहभागी होऊ नये, आपले व्यवहार हे सुरळीत चालू ठेवावेत असे आवाहन पावसकर यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









