प्रतिनिधी / भुईंज
जोशी विहीरनजीक राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलावर मालट्रक आणि कारचा झालेल्या भीषण अपघातात विटा येथील दोनजण जागीच ठार झाले आहेत. तर कारमधील चारजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.9 च्या पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी कार क्रमांक एम. एच. 10 सीएक्स 9807 कारमधून विटा (जिल्हा सांगली) सुभाष बाबुराव पाटील (वय 71), प्रवीण माळी (वय 19), महेश महादेव नवाळे (वय 42), प्रवण दीपक लोंढे (वय 21), आणि शुभांगी महेश नवाळे (वय 35) आणि शबाना मोहम्मद पठाण हे नाशिककडे निघाले होते.
सातारा-पुणे या महामार्गावरून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना पहाटेच्या सुमारास कार वाई तालुक्यातील जोशविहिर येथील उड्डाणपुलावर आल्यानंतर कारने पुढे जात असलेल्या मालट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात त्यामधील सुभाष बाबुराव पाटील आणि प्रवीण माळी या तरुणांसह या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर महेश महादेव नवाळे, प्रवण दीपक लोंढे, शुभांगी महेश नवाळे, शबाना मोहम्मद पठाण हे चारजण गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव आणि भुईंज पोलीस ठाण्यातील हवालदार शिवाजी तोरडमल यांनी उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. नंतर त्यांना उपचारासाठी साताऱ्यातील गिरिजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भुईंज पोलीस अधिक तपास करीत आहेत.