प्रतिनिधी / कुडाळ
मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आज सायंकाळी सहाच्या दरम्यान जोरदार पावसासह गाराचा मोठया प्रमाणात पाऊस पडला क्षेत्र महाबळेश्वर मध्ये रस्त्याच्या दुतर्फा गारांचा खच दिसून आला महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांनी व स्थानिकांनी या पावसाचा व गारांचा आनंद घेत भर रस्त्यात आपली वाहने उभी करत पावसाचा व बर्फाचा आनंद लुटला त्याचबरोबर स्थानिकांनी व पर्यटकांनी बर्फाच्या साठलेल्या चादरीवर स्केटिंग करत स्केटिंग करण्याचा आनंद पर्यटकांसह स्थानिकांचाही घेतला.