प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्यातील आंबवडे बुद्रुक येथील विजय प्रतापसिंह गुजर (वय 50) यांनी महादरे तळ्यात काल रात्री उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
सातारा तालुका पोलिसांना याची सकाळी साडे आठ वाजता माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम सातारा यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाच्या खिशात आढळून आलेल्या पाकीटातील कागद पत्रावरून ओळख पटली आहे. सातारा तालुका पोलीस तपास करत आहेत.
महादरे तळ्याला जाळी बसवण्याची मागणी
सलग तीन दिवसात महादरे तळ्यात दोन आत्महत्या घडल्या आहेत. त्यामुळे सातारा पालिकेने तळ्याला जाळी बसवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.