नरेंद्र पाटील उद्या आपली भूमिका जाहीर करणार, मराठा समाज नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी
सातारा / प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक घटना घडत आहेत.त्यातील एक म्हणजेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा घेतलेला निर्णय.या निर्णयाचा सातारा जिल्ह्यातील मराठा बांधवांनी सोशल मीडियावर आय सपोर्ट नरेंद्र अण्णासाहेब पाटील हॅश टॅग म्हणून त्यांना सपोर्ट करत महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त होत आहे.दरम्यान, नरेंद्र पाटील हे उद्या दुपारी आपली भूमिका मांडणार आहेत.
मराठा समाजासाठी लढणारा नेता म्हणून पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागातील झुंझार नेता म्हणून नरेंद्र पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.त्यांच्याकडे महाविकास आघाडीच्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ठेवले होते.मात्र, नुकतेच महाविकास आघाडी सरकारने हे महामंडळ बरखास्त करण्यात आले.त्यामुळे जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. आय सपोर्ट नरेंद्र अण्णासाहेब पाटील अशी सोशल मीडियावर चळवळ सुरू आहे.नरेंद्र पाटील हे उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









