प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांना उत आला आहे.लॉकडाऊन नंतर मटका, जुगार जोरात सुरू झाला.त्याला अटकाव घालण्यासाठी सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सक्त सूचना दिल्या गेल्या आहेत.त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी सातारा शहरातले मटका अड्डे बंद करण्याचा विडा उचलला आहे.त्यांनी सर्व बुक्की व फंटर यांची माहिती गोळा केली असून त्यांचा बिमोड करण्यासाठी एक पथक तयार केले आहे.शहरात गुरुवार परज येथे याच पथकाने मटका अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या महिलेसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून 1लाख 95 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यात मटका सध्या लॉक डाऊनचे नियम शिथिल होताच चांगलाच ओपन झाला आहे.बुकीं आणि फंटर शहरात ठिकठिकाणी मटका चालवत आहेत.मटका व्यवसाय क्लोज करण्याचे आदेश आणि सूचना पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिल्या गेल्या आहेत.त्यानुसार शनिवारी दुपारी सातारा उपविभागीय अधिकारी समीर शेख यांनी शहरातील मटका बुकींची सर्व खाती क्लोज करण्याचे ठरवले आहे.त्यानुसार त्यांनी तयार केलेल्या टीमने आज अचानक गुरुवार परज येथे छापा मारला.मटका खेळणाऱ्याची पळापळ झाली.पोलीस येताच मटक्याचे साहित्य टाकून पळण्याच्या तयारीत असलेल्या सर्वांना ताब्यात घेतले.त्यामध्ये संतोष संपत माने(वय 40, रा.गुरुवार पेठ), गुलाब यासिन आतार(वय 58, रा.गडकर आळी), शरद श्यामराव साळुंखे(वय 52, साई कॉलनी शाहूनगर), प्रकाश शंकर भट(वय 65, रा.यादोगोपळ पेठ),प्रकाश साहेबराव मोरे(वय, 35, रा.चारभिंती झोपडपट्टी), होमजी श्रीरंग कांबळे(वय40, रा.दुर्गा पेठ सातारा), सौ.लता अशोक कांबळे(वय 50, शनिवार पेठ सातारा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 10 रुपयांच्या 19 नोटा, 20 रुपयांच्या 10 नोटा, 50 रुपयांच्या 7 नोटा, 100 रुपयांच्या 18 नोटा,200 रुपयांच्या 2 नोटा, 500 रुपयांच्या 5 नोटा असा सुमारे 1लाख 95 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या सुचनेवरून करण्यात आली.या कारवाईत पोलीस हवालदार दादासाहेब बनकर,अंकुश यादव,मनोज शिंदे,मांढरे, कदम यांचा सहभाग घेतला होता.








