कारवाईला पालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी लावलाय ब्रेक
पश्चिम भागातले नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
युनियन भाजी मंडईतले विक्रेते ही रस्त्यावर ?
प्रतिनिधी / सातारा
शहरातील राजवाडा ते मंगळवार तळे जाणाऱ्या या रस्त्यावर सतत फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांच्यात बसण्यावरून वादविवाद सूरु असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला विक्रेते बसत असल्याने पालिका कारवाई करायला गेली तर एका नगरसेवकाने हस्तक्षेप केल्याची जोरदार चर्चा आहे. हातगाडा लावल्याच्या कारणावरून काल सायंकाळी दोन विक्रेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. मात्र, या प्रकारामुळे हा परिसर सुरक्षित नाही. कारवाई करून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी पश्चिम भागातील नागरिक करू लागले आहेत.
येथील मंगळवार तळे परिसरात जाणारा रस्ता अतिशय गर्दीचा बनला आहे. कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव पहाता या रस्त्यावर युनियन भाजी मंडईत विक्रेत्यांना पालिकेने गाळे दिलेले असताना नव्याने काही विक्रेते तयार झाले आहेत. ते आपला व्यवसाय राजवाडा ते विठोबा मंदिर पर्यत बसलेले असतात. रस्त्याच्या दुतर्फा हे किरकोळ विक्रेते बसतात. पालिकेचे पथक आले की तेवढ्यापुरते उठतात आणि पुन्हा तेथेच बसतात. पालिकेचे पथक कारवाई ला सतत येत असते. सध्या कोरोनाच्या काळात कारवाई झाली नाही. पण गेल्या दोन दिवसांपूर्वी अतिक्रमण विभागाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या होत्या.
मात्र, अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यावर एका नगरसेवकांवर दबाव आणला गेल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे ही कारवाई बाळगली. दररोज या रस्त्यावर विक्री करणाऱ्यांच्यामध्ये वाद सुरू असतात. मंगळवारी सायंकाळी असाच दोन विक्रेत्यांमध्ये वाद सुरू होता. याची पोलिसात नोंद झाली नाही. मात्र, अशा घटना वारंवार येथे घडत आहेत. पालिकेने हा रस्ता मोकळा करावा, पोलीस चौकी लवकर सूरु करावी, अशी मागणी पश्चिम भागातील नागरिकांनी केली आहे. आंदोलन करण्याच्या पवित्र्यात नागरिक आहेत.









