प्रतिनिधी / कुडाळ
महाबळेश्वर – केळघर रस्त्याच्या बांधकामात उपअभियंता निकम यांनी रेगडीच्या भूगर्भ शास्त्रज्ञाच्या अहवालानुसार कोणतीही उपाययोजना न करता रस्त्याचा प्रकार बदलत लॉकडाऊमध्ये काम केल्याने अडचण निर्माण झाली आहे. भूस्खलनाचा धोका कायम राहत बोडारवाडी व भावळे गावे गाडली जाण्याची भीती भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालात व्यक्त होत आहे.
केळघर घाटातील रेंगडी गावाजवळील भागाचा भूगर्भशास्त्रज्ञांनी २०१८ साली सर्व्हे केला होता. या अहवालानुसार फक्त कागदोपत्री सुरक्षेकरिता महसूल विभागाने देखील भावळे, रेंगडी, बोडारवाडी गावांना धोका असल्याच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र ठेकेदार गडोख आणि त्यांच्या कंपनीकडून काळाकडा ते रेंगडी गावापर्यंतचा रस्ता करताना भूस्खलनाचा धोका असतानाही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता निकम यांनाही या अहवालाची माहिती असताना त्यांनी डोळे झाकूनच हे काम पुढे नेलं. महाबळेश्वर ते काळाकडा या रस्त्याच्या बांधकामात काही महत्त्वाच्या बाबींमध्ये त्रुटी राहिल्या आहेत, ज्या पुढे धोकादायक ठरु शकतात त्याकडे लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य जनता, चालक आणि प्रवाशांकडून होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









