सातारा / प्रतिनिधी :
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चाच्यावतीने साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भाजपा महिला मोर्चाच्या सुवर्णादेवी पाटील, सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी संजय राठोड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.









