सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / उंब्रज
भवानवाडी ता. कराड येथील खरजुलीआई डोंगर पायथ्यालगत सुरू असणाऱ्या जुगार अड्डावर उंब्रज पोलिसांच्या संयुक्तिक पथकाने छापा टाकुन सुमारे सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी १९ जणांना उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भवानवाडी ता. कराड येथील खरजुलीआई डोंगर पायथ्याला जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती
मिळाल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक मोहन तलबार तसेच हवालदार सागर बर्गे, प्रविण पवार, सचिन देशमुख, निलेश पवार, वैभव यादव, दत्तात्रय लवटे, महेश घुटूकडे, यांच्या पथकाने एकत्र मिळुन छापा टाकला.
या कारवाई दरम्यान संशयित दत्ता सुदाम सोनावले वय ३८ रा.सासपडे, निसार गुलाब आत्तार वय ४२ रा.वडूज ता.खटाव, सुभाष शंकर पवार वय ५४ रा.आटपाडी ता.आटपाडी जि.सांगली, विकास महादेव जाधव वय ४४ रा.तांबवे ता.कराड, नाना किसन चव्हाण वय ५१ शिवडे ता.कराड, दिलीप बाबुराव वाडकर वय ६३ रा. करंजेपेठ सातारा, दादासो विश्वनाथ जाधव वय ४७ रा.आर्वी ता.कोरेगांव, अमर तुकाराम तांबे वय ४३ रा.उंब्रज ता. कराड, गणेश सुभाष शिंदे, वय ३८ रा.चिंचणी (अंबक) ता. कडेगाव, सुनिल वामन भिसे वय ४९ रा.सातारा, संजय श्रीरंग पडवळ वय ४९ रा.केंजरे ता.सातारा, सागर प्रकाश जाधव वय २४ रा.उंब्रज ता.कराड, अनिकेत रमेश बाबर वय १८ रा.उंब्रज ता.कराड, सैफअली सत्तार शेख वय २६ रा.शनिवार पेठ सातारा, तन्वीर ईक्वाल शेख वय २९ रा. गुरुवार पेठ सातारा, आकाश चंद्रकांत देशमाने वय २८ रा.काशिळ, हर्षद नईम शेख वय २६ रा.रायगांव (आनेवाडी) ता.जावली, विरजु कुमार दिनेश पंडित, वय २४ रा.झारखंड, भारत सदाशिव घाडगे वय ५५ रा.उंब्रज कदम मळा ता.कराड हे संशयित तीन पत्ती जुगार खेळत असताना मिळुन आले. त्यांच्याकडील वाहने, मोबाईल व ५३,०८०ची रोख रक्कम, जुगार साहित्य असा एकुण ३,२५,२८० रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. सदर १९ जणांवर उंब्रज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणेत आला असून पुढील तपास हवालदार अभय भोसले हे करीत आहेत.









