प्रतिनिधी / सातारा
कोरोनामुळे सगळ्यावर संकट आहे. याच संकटातून कोणी सुटले नाही. राज्य शासनाने मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत. दि.17 सप्टेंबरच्या राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशानुसार ब्रह्ममुंबई महानगरपालिकेतर्फे मोफत ऑन लाईन वर्ग सुरू केले आहेत. याचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी केले आहे.
सध्या कोरोनामुळे प्रत्येकावर संकट आहे.या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.मुलांच्या शिक्षणासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने वारंवार प्रयत्न केले आहे.दि.17रोजी काढलेल्या आदेशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे.राज्यातील शाळा सुरू करणे शक्य नसल्याने 15 जून 2020 पासून शैक्षणिक वर्ष सुरू करुन स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि शाळा व्यवस्थापन समिती यांना 15 जूनच्या शासन आदेशानुसार प्रदान करण्यात आले आहेत.तसेच ऑन लाईन शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यतच्या विध्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी व शिक्षणाबाबत मार्गदर्शन निर्गमित करण्यात आले आहे.इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत सर्व पाठय पुस्तके सर्व विद्यार्थ्यांना घरपोच करण्याची व्यवस्था केली आहे.दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर युनिसेफच्या सहकार्याने गली गली सिम सिम हा कार्यक्रम दररोज सकाळी दहा वाजता प्रक्षेपित होत असतो.
तर टिली मिली तसेच जिओ टीव्हीवर ज्ञानगंगा, गुगल क्लास रूम व मिस कॉल द्या गोष्ट ऐका असे उपक्रम सुरू आहेत.मुंबई महानगर पालिकेने इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू या चार माध्यमातून अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू केले आहेत.हे वर्ग चांगल्या शिक्षकांच्याकडून सुरू आहेत.झूम, गुगल व व्हॉट्सअपच्या माध्यमातून
शासनाच्या ऑन लाईन वर्गात प्रवेश घेण्यासाठी पालक व विद्यार्थांनी ब्रह्ममुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करावा, ऑन लाईन प्रवेश मंजूर झाल्यावर लिंक देण्यात येते.उपस्थित राहणे आवश्यक आहे.ज्या वर्गात प्रवेश घेतला त्या वर्गात सूचना पाळणे व मूल्यमापन प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक आहे.ऑन लाईन वर्ग मोफत आहेत.प्रगती पुस्तक व हजेरी प्रमाणपत्र देण्यात येईल असे म्हटले आहे.त्यानुसार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी आवाहन केले आहे.
पहिली ते दहावीपर्यंत सर्व माध्यमाचे तालुका निहाय विद्यार्थी
जावली 11 हजार 224
कराड 82 हजार 800
खंडाळा 23 हजार 939
खटाव 36 हजार 914
कोरेगाव 31 हजार 942
महाबळेश्वर 16 हजार 68
माण 33 हजार 18
पाटण 33 हजार 228
फलटण 48 हजार 878
सातारा 76 हजार 28
वाई 27 हजार 144
जिल्ह्यात 4 लाख 21 हजार 183









