वार्ताहर/कास
ठोसेघरकडे जाणाऱ्या मार्गावरील बोरणे घाटात पावसामुळे गुरुवारी मध्यरात्री दरड कोसळल्याने आज, शुक्रवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र वाहनचालकांसह प्रवाशांनी छोठे छोठे दगड हटविल्याने एकेरी वाहतुक सुरु झाली असुन मोठमोठे दगड अदयाप रत्याच्या मधोमधच असल्याने ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
परळी ठोसेघर कास परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी दरडी, झाडे कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. गुरूवारी मध्यरात्री ठोसेघरकडे जाणाऱ्या मार्गावरील बोरणे घाटात दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सकाळी चाळकेवाडी पठारवरील पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस तेथे पोहचली आणी त्या बस मधील सात आठ कर्मचाऱ्यांनी व इतर वाहन चालकांनी रोडवरील छोठे छोठे दगड हटवुन एकेरी वाहतुक सुरु केली. मात्र रस्त्यावर अद्याप मोठे मोठे दगड असल्याने ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ मोठमोठे दगड हटवुन वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी वाहनधारकासह प्रवाशातून होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









