चार महिन्यातील दुसरी घटना, बिबट्याच्या वावराने नागरिक भीतीच्या छायेत
प्रतिनिधी/नागठाणे
बोरगाव (ता.सातारा) येथे वन्य प्राण्यांने केलेल्या हल्ल्यात ६ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. या घटनेची माहिती वनविभाग व नागठाणे पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामे केले. दरम्यान हा हल्ला बिबट्याने केला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी रात्री ही घटना घडली
बोरगाव ते आनंद कृषी पर्यटन जाणाऱ्या रस्त्यालगत वडा-पिंपळ नावाच्या शिवारात शरद बबनराव साळुंखे यांचे शिवार आहे. या शिवारात त्यांचा जनावरांचा गोठा व शेळ्यांचे शेड आहे. त्यांच्या सुमारे १० शेळ्या या शेडमध्ये असतात. रविवारी सायंकाळी या सर्व शेळ्या शेडमध्ये बंदिस्त करून ते घरी आले. रात्री उशिरा वन्य श्वापदाने या शेडमध्ये प्रवेश करून सहा शेळ्या ठार केल्या. यामध्ये १ बोकड, ५ शेळ्या यांचा समावेश आहे. त्यापैकी ३ शेळ्या गाभण होत्या. सोमवारी सकाळी शरद साळुंखे शेडकडे गेले असता ही घटना उघडकीस आली. यात साळुंखे यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती त्यांनी या विभाग व नागठाणे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला दिली.
वनविभागाचे वनसंरक्षक राज मोसलगी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक माने, जितेंद्र पांढरपट्टे हे तातडीने घटनास्थळी उपस्थित होत पंचनामे केले. यावेळी हल्ला करणारे वन्य श्वापद हे पायाच्या आढळलेल्या ठश्यावरून बिबट्या असून या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांना दिली आहे. या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची माहिती वनसंरक्षक राज मोसलगी यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









