वार्ताहर / वाठार किरोली
बोरगाव ता. कोरेगाव येथील कै. मुरलीधर गणपती घाडगे (गुरुजी) यांचे चिरंजीव श्रीनिवास घाडगे यांची पुणे शहर गुन्हा अन्वेषन विभागाच्या उपायुक्तपदी बढती मिळाली. त्यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा बोरगांव येथे झाले. लहानपनापासुन अत्यंत शांत, संयमी, हुशार आणि अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी ठेवून ते सत्यात उतरवनारा जिद्दी ,महत्वकांक्षी युवक म्हणून बोरगावचे ग्रामस्थ त्यांच्याकडे पहात होते. त्यांनी ग्रामसेवक पदापासून ते कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई इथपर्यंत मजल मारली. पोलिस उपअधीक्षक ते सध्या पुणे शहर गुन्हा अन्वेषण विभागाचे उपायुक्त अशा विविध प्रशासकीय पदावर काम करून ते तरुण पिढीचे आयडॉल बनले आहेत.
बोरगाव सारख्या ग्रामीण भागातून जाऊन त्यांनी आपल्या गावाबरोबरच कोरेगाव तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. श्रीनिवास घाडगे यांची पुणे शहर गुन्हा अन्वेषण विभागाचे उपायुक्त पदावर बढती झालेबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष सुनिलराव माने, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भागवतराव घाडगे यांनी अभिनंदन केले. त्यांच्यावर बोरगाव ग्रामस्थ तसेच परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.