सोळा वर्षात 6 हजार बेवारस मृतदेहावर केले अंत्यसंस्कार, अल्प मानधनात राबतोय, कोरोना काळात 15 मृतदेहाना शासकीय नियमानुसार दफन
विशाल कदम / सातारा
मृत्यू खूप भयानक आहे.मृत्यू पश्चात विधी हे पाठीमागे कोण नातेवाईक असेल तर केला जातो.बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारा त्यांचा नातेवाईकच म्हणा, ज्याला कोण नाही त्याला विकास जाधव यांचा शेवटी हात लागतो.ते कार्य अविरतपणे गेल्या 16 वर्षांपासून अल्प मानधनात करतात.कोरोनाच्या या सहा महिन्यांच्या काळात त्यांनी 15 मृतदेहाना शासकीय नियमानुसार दफन करण्यात आले.
मानव जातीत मृत्यूनंतर विधी केला जातो. प्रत्येक धर्मात वेगवेगळे स्वरूप असले तरी ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांचे विधी होत असतात.मात्र, ज्यांना कोण नसते,अनोळखी मृतदेह आढळून आलेला असतो.त्यावर शासकीय यंत्रणा नियमानुसार दफन केली जाते.सातारा येथे ही पालिकेच्या माध्यमातून रोजमदारीवर बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारा विकास मारुती जाधव हे अवलिया आहेत.विकास जाधव यांची आई सातारा पालिकेच्या कर्मचारी होत्या तर वडील साताऱ्यातच मिळेल ते काम करायचे.शिक्षण जेमतेम सहावी पर्यन्त झाले.आई पालिकेत कामाला असल्याने पालिकेचे कर्मचाऱ्यांच्या सोबत ते दिवस घालवत असायचे.त्यावेळी संभाजी माने हे पालिकेच्यावतीने बेवारस मृतदेहाचे काम करायचे.त्यांच्यासोबत विकास यांची गट्टी बनली.सुरुवातीला माने यांनी खड्डा कसा खोडायचा.मृतदेह कसा खोदलेल्या खद्यात सोडायचा याचे प्रशिक्षण त्यांनी दिले.माने हे सेवानिवृत्त झाल्यानंतर पालिकेने हे काम विकास यांच्याकडे सोपवले.ते आज पर्यंत 16 वर्षात 6 हजार मृतदेहावर त्यांनी सोपस्कार पार पाडले आहेत.जिल्हा रुग्णालयातून बेवारस मृतदेहावर 24 तासात विल्हेवाट लावण्याचे पत्र विकास जाधव यांना मिळताच जाधव हे तो मृतदेह व्यवस्थित गुंडाळून पालिकेच्या ट्रकक्टरमधून पालिकेच्या गेंडा माळ नाक्यावर आणले जाते.तत्पूर्वी आदल्या दिवशीच विकास जाधव हे 6 फूट लांब व 5 फूट खोल खड्डा खोदून ठेवतात.तो मृतदेह त्या खद्यात दफन करतात.मृतदेह दफन केल्यानंतर ते आवर्जून फुलं वाहतात.तेच त्यांचे नातेवाईक बनून श्रद्धांजली अर्पण करतात.मग तो बेवारस मृतदेह कोणत्या जातीचा कोणत्या धर्मातील आहे हे त्यांना माहीत नसते.आणि ते माहिती करून घेण्याच्या फंदात पडत नाहीत.मात्र, हे काम करताना त्यांना फक्त एका मृतदेहावर 1 हजार रुपये मिळतात.त्यावर त्यांचे कुटूंब चालते.कोरोना काळात सहा महिन्यात बेवारस अशा 15 मृतदेहावर सोपस्कार केले.एखादा बेवारस मृतदेह पोलीस तपासात किंवा नातेवाईकांचा शोध लागल्यावर त्यांनी परत बॉडी मागितली तर तो खड्डा उकरून अवशेष द्यावे लागतात, हे अवघड काम विकास जाधव करत आहेत.
पालिकेने त्यांचे मानधन वाढवावे
आजच्या महागाईच्या काळात गरीबांना जगणे मुस्किल बनले आहे.अशा काळात केवळ एक मृतदेहावर दफन संस्कार करण्यासाठी केवळ 1 हजार रुपये मानधन पालिका देते.जाधव यांचे कुटूंब त्या तुटपुंज्या मानधनात काम करत आहे.त्यांचे मानधन किमान पाच हजार करावे किंवा पालिकेने त्यांना कायम करण्यात यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे.
Previous Article‘स्वयंपूर्ण गाव, संपन्न गोंय’ नवी योजना
Next Article मुंबईतून मुलीचे अपहरण करणारा युवक ताब्यात









